गीतेचा मुख्य उद्देश
भगवद्गीतेचा मुख्य हेतु असा की, भगवंतांनी अर्जुनास निमित्त करून मानवजातीच्या कल्याणासाठी उपदेश केला आहे. कारण,
जगामध्ये मनुष्यांचे कल्याण होणार नाही अशी एकही परिस्थिती नाही.
मनुष्यासमोर कोणतीही आणि कशीही परिस्थिती येवो तिचा केवळ सदुपयोग करावयाचा आहे.
सदुपयोग करण्याचा अर्थ आहे दुःखदायक परिस्थिती प्राप्त झाली
तर सुखाच्या इच्छेचा त्याग करणे आणि सुखदायी परिस्थिती प्राप्त झाली तर सुखोपभोगाचा आणि परिस्थिती अशीच कायम टिकून राहो
या इच्छेचा त्याग करणे आणि तिला दुसऱ्याची सेवा करण्यामध्ये लावणे.
अशा प्रकारे सदुपयोग केल्यास मनुष्य सुखकारक आणि दुःखकारक या दोन्हीही परिस्थितीहून वर उठतो अर्थात् त्याचे कल्याण होते.
- स्वामी रामसुखदास